ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात ‘हाणामारी’? व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेंस्की यांच्यातील भांडण सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पण यावेळी कारण आहे AI तंत्रज्ञानाने बनवलेला एक ‘फेक हाणामारीचा व्हिडिओ’ जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ(video) पाहून काहीजण आश्चर्यचकित झाले, काहींना हसू आलं, तर काहींनी AI च्या वापरावर चिंता व्यक्त केली.

मागच्या महिन्यात जेलेंस्की अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. रशियाविरोधातील मदतीसाठी त्यांनी अमेरिकेची भेट घेतली होती. यावेळी ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात शब्दयुद्ध झाल्याचे वृत्त होते. ट्रम्प यांनी जेलेंस्कींना “तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय” असे म्हणत थेट सुनावले होते. या बाचाबाचीदरम्यान NSA माईक वेंस यांना हस्तक्षेप करावा लागला.

आता याच वादावर AI तंत्रज्ञानाने काल्पनिक “हाणामारीचा व्हिडिओ” तयार केला आहे. हा व्हिडिओ(video) प्रत्यक्षात घडलेला नसून, AI आधारित सर्जनशीलता वापरून तो तयार करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि जेलेंस्की एकमेकांवर धावून जातात, हातघाई होते, आणि सुरक्षारक्षक त्यांना वेगळं करतात – हे सर्व दृष्य पूर्णपणे बनावट असूनसुद्धा इतकं वास्तववादी वाटतं की कोणीही गोंधळून जाईल.

AI चं हे रूप बघून अनेक तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. फक्त एक व्हिडिओ पाहून कोणीही खोटं सत्य मानू शकतं. आज AI मुळे व्हिडिओज, फोटो, अगदी आवाजही हुबेहूब बनवता येतात. पण अशा फेक व्हिडिओमुळे राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गोंधळ निर्माण होऊ शकतो, असं जाणकार सांगतात.

सध्या अमेरिकेतील आणि जगभरातील सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हशा केला, तर काहींनी “AI is getting out of hand” असं म्हणत धोका दर्शवला.

हेही वाचा :

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

माझ्या आईला हात लावशील तर…; महिलेचा राग झाला अनावर; धक्कादायक Video Viral

भांडण करणं पतीला पडलं महागात, पत्नीने थेट छतावरूनच खाली फेकलं… Video Viral