बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या लोकप्रियतेविषयी काय सांगायचं. त्याच्यासोबत जर कोणाची चर्चा होते ती म्हणजे त्याचा बॉडीगार्ड शेराची. शेरा सलमानसोबत त्याच्या सावलीसारखा राहतो. आता सोशल मीडियावर सलमान खानच्या बॉडीगार्डचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये(Video) शेरा पापाराझींवर संतापल्याचे दिसत आहे. शेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर मजेशीर कमेंटस येत आहेत. तर एका नेटकऱ्यानं थेट कमेंट करत ‘अप्रेजलचा काळ आहेना.’

शेराचा हा व्हिडीओ(Video) सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान कोणत्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. सलमान खानच्या पुढे शेरा चालतोय. तो पापाराझींवर ओरडताना दिसत आहे. तो पॅप्सला फोटो आणि व्हिडीओ घेण्यापासून थांबवताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तो ओरडताना दिसतोय. तो बोलतोय, ‘कोणी नको पाहिजे, सगळ्यांनी तिथे जा. सगळ्यांनी तिथे जा.’ व्हिडीओमध्ये एका ठिकाणी शेरा पॅप्सच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे आणि बोलतोय की ‘ओए, बस कर आता.’ शेरा पापाराझींना ओरडत होता पण सलमान देखील यावेळी काही बोलला नाही. तो आला आणि गंभीर चेहरा करत गाडीत बसला.

शेराच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की ‘हा अप्रेजलचा काळ आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खानसमोर कोणी बोलू शकतं का? हा सलमान खान.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘असं वाटतंय की सिकंदरमुळे शेराचा आता पासून पगार कमी झाला आहे.’
दरम्यान, सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. खरंतर, सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई करू शकला नाही. चित्रपटानं सलमान खानसोबत रश्मिका मंदाना देखील दिसली होती. तर त्याच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच सलमान खानच्या ‘टाइगर वर्सेस पठान’ आणि ‘किक 2’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सलमान आणि शाहरुखच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात.
हेही वाचा :
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!
ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात ‘हाणामारी’? व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
माझ्या आईला हात लावशील तर…; महिलेचा राग झाला अनावर; धक्कादायक Video Viral