सैफ अली खान आणि करीना कपूर लग्नाच्या 13 वर्षांनी घेणार घटस्फोट?

आयफा अवॉर्ड्समध्ये तिचा एक्स प्रियकर शाहिद कपूरला मिठी मारल्यापासून करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. आता पुन्हा एकदा एका ज्योतिषाने त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल एक भाकित केलं आहे. ते सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर, या व्हिडीओनंतर सैफ अली खानसोबत करीनाचा घटस्फोटाच्या(divorce) अफवा जोर धरत आहेत.

ज्योतिषाने एक मोठा दावा केला आहे की, दोघेही दीड वर्षात घटस्फोट(divorce) घेऊ शकतात. ज्योतिषाने अशा परिस्थितीचे कारण देखील स्पष्ट या व्हिडीओमध्ये केलं आहे. दरम्यन सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा सैफ अली खानवर प्राणघात हल्ला झाला होता, तेव्हा करीना कपूर घरात होती. तरीदेखील ती दोन तास हॉस्पिटला गेली नव्हती. खरं तर सैफ अली खान गंभीर जखमी असतानाही करीना कपूर सैफ सोबत हॉस्पिटला गेली नव्हती. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या या दावात काही तथ्य असेल असं चाहत्यांना वाटतं.

सैफ अली खान आणि करीना कपूर गेल्या 13 वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत आहेत, पण आता एका ज्योतिषाने भाकित केले आहे की पुढील दीड वर्षात त्यांचे नाते संपुष्टात येणार आहे. आयफा अवॉर्ड्समध्ये करीना कपूर शाहिद कपूरला मिठी मारताना दिसली तेव्हा ज्योतिषाचा हा दावाने जोर धरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये, ज्योतिषी सुशील कुमार सिंह सैफ-करीनाच्या नात्याबद्दल धक्कादायक दावा करत आहेत. सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीत त्यांनी ही खळबळजनक भविष्यवाणी केली आहे.

ज्योतिषी एका मुलाखतीत म्हणाले, ‘मी तुम्हाला 2010 मध्येच सांगितले होतं की हे लग्न जास्त काळ टिकणार नाही. सैफ आणि करीना यांच्यातील घरगुती वाद वाढू शकतात आणि दीड वर्षात घटस्फोट होऊ शकतो, असा त्यांचा दावा त्याने केला आहे.

सैफ आणि करीनाचे लग्न 15-16 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही आणि पुढील दीड वर्षात ते वेगळे होऊ शकतात, असे भाकीत ज्योतिषाने केले आहे. मात्र, दोन्ही स्टार्सनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सैफ-करीनाच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे चाहतेही गोंधळले आहेत. त्यांच्या नात्यात तणाव आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या भाकिताबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणतात की ज्योतिषाचा दावा खोटा आहे, तर काहींना वाटते की ते शक्य आहे.

हेही वाचा :

ठाकरेंना आणखी एक धक्का! कोल्हापुरातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश;

लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video