आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी भारतीय क्रिकेटपटू(Cricketer) केएल राहुलची एक मजेदार मुलाखत चर्चेत राहिली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी एका केएल राहुलची एक मुलाखती घेतली जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड करत आहे. आता यात नक्की काय संवाद घडून आला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर का इतका व्हायरल होत ते ते जाणून घेऊया.

अंतिम सामना संपल्यानंतर संजना गणेशनने आपल्या मुलाखतीत केएल राहुलला(Cricketer) विचारले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, विशेषतः भारताचे स्पिनर गोलंदाज वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्याविरुद्ध विकेटकीपिंग करणे किती ‘मजेदार’ होते. यावर उत्तर देताना राहुल म्हणाला, ‘हे अजिबात मजेदार नव्हते नाहीये संजना. जेव्हा हे स्पिनर गोलंदाजी करत असतात तेव्हा मला २००-२५० सिट-अप करावे लागतात.
केएल राहुल स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, ‘मला वाटत नाही की यापेक्षा चांगली भावना असू शकते.’ काही महिन्यांपूर्वी मी एका मुलाखतीत म्हटले होते की आतापासून माझे संपूर्ण लक्ष शक्य तितके जास्त जेतेपद जिंकण्यावर आहे. देवाने मला अशा परिस्थितीत ठेवले आहे जिथे मी माझ्या संघासाठी सामने जिंकू शकतो. मी नेहमीच ते करू शकलो नाही, पण हेच या खेळाचे सौंदर्य आहे.
तुम्हाला संधी मिळत राहतात. जर तुम्ही नम्र राहिलात, तुमचे मन योग्य ठिकाणी ठेवले, कठोर परिश्रम केले आणि फक्त तुमच्या बॅटने प्रतिसाद दिला तर देव तुम्हालाही आशीर्वाद देण्याचा मार्ग शोधून काढेल. मी एवढेच म्हणू शकतो, आम्ही आमच्या कारकिर्दीत वर्षभर कठोर परिश्रम करतो, मात्र असे क्षण खरोखरच खूप खास असतात.
मुलाखतीचा हा व्हिडिओ स्वतः आयसीसीने आपला @icc नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओला उत्तम व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्वात नम्र केएल राहुल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “केएल राहुलकडे सर्वोत्तम शब्दसंग्रह आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान KL”.
हेही वाचा :
गुड न्यूज! पेट्रोल-डिझेलचे दर उतरणार! 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण होणार
‘सॉरी बोल…’ तमन्नावर टीका करणारी पोस्ट करून लगेच डिलीट; उर्वशीवर भडकले फॅन्स
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? ‘या’ पदार्थांसाठी आहे ‘No Entry’