आयपीएलमधील(sports news) कालची (मंगळवारची) 31 वी मॅच रोमहर्षक ठरली आहे. पहिल्यांदा कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबला 111 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. तर, पंजाबच्या गोलंदाजांनी केकेआरला 95 धावांवर रोखत विजय मिळवला. यामध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी महत्त्वाची ठरली. युजवेंद्र चहलनं केकेआरच्या फलंदाजीला सुरुंग लावला. तर कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांची 50 धावांची भागीदारी मोडण्यात चहलला यश आलं.

अजिंक्य रहाणेला त्यानं 17 धावांवर बाद केलं. युजवेंद्र चहलच्या(sports news) गोलंदाजीवर रसेलनं फटकेबाजी केली. मात्र, रसेल केकेआरला विजय मिळवून देऊ शकला नाही. युजवेंद्र चहलनं 4 विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाची सहमालक प्रिती झिंटा हिनं मॅचनंतर चहलला मिठी मारत त्याचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून चहलसोबत वारंवार दिसणारी कथित प्रेयसी आरजे महवशने आनंदाच्या भरात चहलसाठी एक फोटो शेअर करत त्याच्या खेळाचं आणि कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे.
अनेकांनी प्रीती झिंटा तसेच भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केलं, प्रिती झिंटानं चहलला मिठी मारली, त्याच कौतुकही केलं. पण आरजे महवशच्या पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सामना संपल्यानंतर, आरजे महवशने इन्स्टाग्राम स्टोरीवरती चहलसोबतचा एक अलीकडील सेल्फी पोस्ट केला आहे. सेल्फी शेअर करताना तिने त्यावरती लिहिले, “किती प्रतिभाशाली व्यक्ती आहे. म्हणूनच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. अशक्य!”
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने फक्त 111 धावा केल्या होत्या. सर्वांना वाटलं होतं कोलकाता नाईट रायडर्स जिंकेल, पण तसं झालं नाही. संघाने 16 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. पंजाबचा हा 6 सामन्यांपैकी चौथा विजय होता. अशाप्रकारे, ते आता गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नंतर चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबत लग्न केले होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी घटस्फोट घेतला, त्यानंतर आता चहलचे नाव आरजे महवशशी जोडले जाऊ लागले. आरजे महवशचे खरे नाव महवश अमू आहे. तिच्या वडिलांचे नाव समीर आणि आईचे नाव जिया अमू आहे. धाकट्या भावाचे नाव अहम अमु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरजे महवश २८ वर्षांची आहे. तिचा जन्म २७ ऑक्टोबर १९९६ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे झाला. ती एक रेडिओ जॉकी आहे.
RJ Mahvash's Instagram story for Yuzi Chahal. pic.twitter.com/Lt2sPd8Xnj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2025
तसेच कंटेंट क्रिएटर, लेखक आणि होस्टसुद्धा आहे. तो प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तिने वुमन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर तिने आरजे मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर आणि जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथूनही शिक्षण घेतले. तिने मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
हेही वाचा :
सर्वोच्च “अधिकार” कोणाचे? राष्ट्रपती की न्यायाधीश?
लाडकी बहीण योजना खरचं बंद होणार? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर