महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये नियमित बस(bus) सेवा पुरवते. दररोज हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. बसचा प्रवास सामान्य नागरिकांसाठी परवडणार असतो. परंतु बसच्या दुराव्यवस्थेचा प्रश्न आजही कायम आहे. सध्या महामंडळाच्या बसचा एक धक्कादायक व्हि़डिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एसटी बसला असचानक आग लाग असून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अक्कलकोट मार्गोने जाणाऱ्या एका बसला(bus) आग लागलेली दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मी़डियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
बस रस्त्याच्या कडेला थांबलेली असताना अचानक इंजिनच्या भागात बसने पेट घेतला. यादरम्यान प्रवासी, बस ड्रायव्हर, कंडक्टर बसमधून बाहेर उतरले. बस चालकाने त्वरित अग्निशमक सिलेंडरच्या मदतीने आग विझवली. बस चालकाने वेळेत सतर्कता दाखवली यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस अगदी जूनी दिसत आहे.
या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून पुन्हा एकदा महामंडळाच्या अव्यवस्थेवर आणि प्रवाशांच्या सुरक्षतेतच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एक प्रवाशाने याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीे वातावरण पसरलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर ही भयानक घटना घडली. नंतर बस पूर्णपण जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. बस चालकाने बसमधून धूर निघत असल्याचे पाहताच सर्व प्रवशांना बसमधून बाहरे पडण्यास सांगितले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने म्हटले आहे की, msrtc च्या सर्व बसेस भंगार आणि जुन्या आहेत. दुसऱ्या एकाने प्रशासनाने यावर लवकर उपाय काढला पाहिजे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने सरकारने याकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर
लाडकी बहीण योजना खरचं बंद होणार? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
तुम हां कर दो, हम दुनिया पलट देंगे… युजवेंद्र चहलच्या ड्रीम स्पेलनंतर आरजे महवशची खास पोस्ट, म्हणाली….