मेट्रोत बसल्यावर डुलक्या खात होता, सुंदर मुलीनं जवळ येऊन असं काही केलं की मुलाची झोप उडाली VIDEO

दिल्ली मेट्रोमधून(metro) दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतो. जिथे कधी कोणी भांडताना दिसतं, तर कधी कोणी प्रेम फुलवताना दिसतं. अशाच एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे मुलीने मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या मुलासोबत असं काही केलंय की त्या मुलाची झोपच उडाली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येतंय की, मेट्रो(metro) ट्रेनच्या डब्यात बसून एक तरुण डुलक्या खात होता. झोपेत असताना त्याचे डोके वारंवार पुढे झुकत होते. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो पुढच्याच क्षणी पुढे पडेल. अशा परिस्थितीत, जवळच उभी असलेली एक सुंदर मुलगी त्या तरुणाच्या डोक्याला आधार देऊ लागली आणि तिच्या हातांनी त्याला मिठी मारू लागली.

ज्याप्रमाणे एखादा प्रिय व्यक्ती त्याच्या प्रिय व्यक्तीला मायेने झोपवतो, त्याचप्रमाणे या मुलीने या अनोळखी मुलासाठीही तेच केले. थोड्या वेळाने, जेव्हा त्या तरुणाला हे कळले, तेव्हा तो लगेच जागा झाला आणि त्याने वर पाहिले तेव्हा त्याला समोर एक मुलगी उभी असलेली दिसली.

हा व्हायरल व्हिडिओ X या सोशल साईट मिडिया प्लॅटफॉर्मवर @veejuparmar नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत 23 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि 18 हजार लोकांनी लाईक केलाय. अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

जिथे एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘Moment hai bhai moment hai ‘… दुसऱ्याने लिहिले – इतकी काळजी करणारी कुठे मिळेल? तिसऱ्याने लिहिले – हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि मुलगा आणि मुलगी दोघेही आधीच एकमेकांसोबत असले पाहिजेत. म्हणजेच दोघे प्रियकर आणि प्रेयसी आहेत.

हेही वाचा :

भयावह ! धावत्या बसने अचानक घेतला पेट… Video Viral

आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर

तुम हां कर दो, हम दुनिया पलट देंगे… युजवेंद्र चहलच्या ड्रीम स्पेलनंतर आरजे महवशची खास पोस्ट, म्हणाली….