‘दिल ही तो है’फेम प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री(actress) गुरप्रीत बेदी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. तिने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केल्यापासून चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने बाळाला जन्म देण्याच्या एक दिवस आधीच बेबी बंप फोटोशूट केले होते आणि दुसऱ्या दिवशी तिने बाळाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म देताच अभिनेत्रीने बाळाचं नावंही सांगितलं आहे. एकदम हटके पद्धतीने अभिनेत्रीने नाव ठेवल्यामुळे तिच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

गुरप्रीत आणि तिचा पती अभिनेता कपिल आर्य आई- बाबा झाले असून त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं नाव एकदम हटके पद्धतीने ठेवले आहे. गुरप्रीत(actress) आणि कपिलने आपल्या बाळाचं नाव जपानी स्टाईलने ठेवले आहे. गुरप्रीत आणि कपिलने इन्स्टाग्रामवर बाळासोबतचा फोटो आणि त्याचं नाव शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
गुरप्रीत आणि कपिलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाळाने आपल्या आई- वडिलांचं बोट धरलेलं दिसत आहे. या फोटोमध्ये बाळाचंही आणि त्याच्या आई– वडिलांचंही चेहरा दिसत नाहीये. गुरप्रीत आणि कपिलने आपल्या बाळाचं नाव ‘अजाए’ असं ठेवलं आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, ‘अजाए बेदी आर्या’
‘अजाए’च्या नावाचा अर्थ ‘ताकद’ असा होतो. गुरप्रीतने २ एप्रिल रोजी लेकाला जन्म दिला. तिने प्रेग्नंसीदरम्यान अनेक फोटोशूट केले जे सोशल मीडियावर आहेत. २०२१ मध्ये गुरप्रीतने कपिल आर्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ४ वर्षांनी तिने गुडन्यूज दिली आहे. बाळाच्या आगमनानंतर दोघांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच गुरप्रीत आणि कपिलने बेबी बंप फ्लॉंट करणारे फोटो शेअर केलेले होते. तिच्या ह्या फोटोंवरही चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
गुरप्रीत शेवटची २०२४ मध्ये टेलिकास्ट झालेल्या ‘श्रीमद रामायण’मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने तिच्या कामाबद्दल सांगितले की, “माझ्याकडे गेल्या वर्षी (२०२४) अनेक चांगल्या ऑफर आल्या होत्या, पण माझ्या प्रेग्नेंसीमुळे मी त्या नाकारल्या होत्या. कामाला नकार देणं थोडं अवघड होतं, पण मला ते करावं लागलं. मी माझ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे आणि जेव्हा मी पूर्णपणे बरी झालेली असेल, फिट असेल, कामासाठी पूर्णपणे तयार असेल तेव्हाच परत येईन.”
गुरप्रीतला २०१८ साली आलेल्या ‘दिल ही तो है’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली. यामध्ये ती करण कुंद्रासोबत दिसली होती. यासोबतच ती ‘कबूल है २.०’,’प्यार के सात वचन धरम पत्नी’, ‘रक्तांचल’, ‘बँग बँग’ या मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :
तुम हां कर दो, हम दुनिया पलट देंगे… युजवेंद्र चहलच्या ड्रीम स्पेलनंतर आरजे महवशची खास पोस्ट, म्हणाली….
आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर
मेट्रोत बसल्यावर डुलक्या खात होता, सुंदर मुलीनं जवळ येऊन असं काही केलं की मुलाची झोप उडाली VIDEO