राजकोट, २४ सप्टेंबर २०२४: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने(government)ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुतळ्याची उंची ६० फूट असेल आणि तो कमीत कमी १०० वर्षे टिकेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
संपूर्ण पुतळा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवण्यात येणार असून, पितळ आणि इतर टिकाऊ धातूंचा वापर करून हा पुतळा घडवला जाईल. पुतळ्याचा आधार मजबूत आणि हवामान-प्रतिरोधक असेल, जेणेकरून तो अनेक वर्षे सुरक्षित राहील. राजकोट किल्ल्यावर हा पुतळा उभारल्याने किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व वाढणार असून, पर्यटकांसाठी देखील मोठे आकर्षण ठरणार आहे.
शिवरायांच्या पराक्रम आणि परंपरेचे प्रतीक असणाऱ्या या पुतळ्याबद्दल शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाबाबत सांगितले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली शौर्य, नेतृत्व आणि न्यायाची शिकवण कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी हा पुतळा उभारला जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राजकोटचा ऐतिहासिक वारसा अधिक उजळून निघेल.”
या पुतळ्याच्या उभारणीसाठी राज्य सरकारने विशेष तांत्रिक आणि स्थापत्य सल्लागारांची नियुक्ती केली आहे, ज्यांच्याकडून १०० वर्षांपेक्षा अधिक टिकणारी संरचना घडविण्यावर भर दिला जाईल. पुतळा आणि त्याच्या सभोवतालचा परिसर सुसज्ज करण्यात येणार आहे, ज्यात पर्यटकांसाठी विशेष सोयी-सुविधा असतील.
या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, राजकोट किल्ल्याचा गौरव पुन्हा एकदा उजळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा:
विठुरायाचे दर्शन होणार सुलभ; दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची महत्त्वपूर्ण तरतूद
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रकृती प्रचंड खालावली
प्रश्न व संशय निर्माण करणारे अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर