येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली. राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपची उमेदवार(candidate) यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
महायुतीने अद्याप उमेदवारी(candidate) यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. बेलापूर, ऐरोली मतदारसंघावर गणेश नाईकांचा दावा असून, जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पक्षांतराची लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्याला तिकीट मिळणार नाही याची चाहूल लागल्यानंतर अनेकजण अगदी पक्ष बदलून विरोधी विचारसरणीच्या पक्षात प्रवेश मिळतो का याची चाचपणी करु लागले आहेत.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनं नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नाराणय राणेंबरोबर शिवसेना सोडणारा एक महत्त्वाचा नेता आता स्वगृही म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
सावंतवाडीतून एकनाथ शिंदेंच्या पक्षातील दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा सावंतवाडीमधील निवडणुकीची चूरस अधिक वाढणार आहे.
हेही वाचा:
शरद पवारांचे अजितदादा गटाला दोन मोठे धक्के
पिक्चर अभी बाकी हैं… बाहुबली 3 संदर्भात मोठी अपडेट
दारू पिऊन छेड काढणाऱ्या कंडक्टरला मुलींनी दिला चोप, चपला काढून बडवलं अन् … Video Viral