काँग्रेसला मोठा धक्का, युवा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजकीय(Congress) वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. सभा, मेळावे, दौरे सुरू झाले आहेत. अशातच काँग्रेसचा तरूण नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार नवाब मलिक यांच्या मतदारसंघात अजित पवार (Congress)यांची जनसन्मान यात्रा काढली जाणार आहे. नवाब मलिक यांनीदेखील या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. याच यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वडिलांपाठोपाठ आता झिशान सिद्दीकी हेदेखील अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झिशान सिद्दिकी हे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आहेत. 2019 मध्ये त्यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केला होता. वांद्र्यात त्यांना मानणारा तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. झिशान सिद्दीकी यांनी मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही भुषवले आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी अजित पवारांकडे जात असतील तर हा काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे.

हेही वाचा :

शेतीच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून

यास विकृती, क्रूरता ऐसे नाव आज कोलकाता, उद्या दुसरेच गाव

फडणवीसांना चिमुकलीची राखी, हे प्रेम कोणालाही नको वाटणार नाही