विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का

संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात(politics) विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यातच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरातील शहरप्रमुखासह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जवळपास सर्वच महिलांच्या पसंतीस उतरली आहे. या योजेनेने प्रभावित होत राज्यातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या सेनेला झटका दिला आहे. तर दुसरीकडे उमेदवारीसाठी नेत्यांचे ठाकरे गटात ‘इनकमिंग’ सुरू असल्याचे संकेत मिळत आहे.

संभाजीनगरातील ठाकरे गटाचे शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेविका शोभा काळे यांच्यासह युवा सेना जिल्हाप्रमुख अशा अनेक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी पुढाकार घेऊन अनेक पदाधिकाऱ्यांना प्रवेश मिळवून देत ठाकरे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना(politics) पक्षात महिलांचे प्रतिनिधित्व दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच 2600 हून अधिक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्व महिलांचे सशक्तीकरण व कल्याणकारी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या दृष्टीकोनाने प्रेरित होऊन झाल्याचे दिसून येत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकर्षण वाढले आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील महिलांना भविष्याची नवी दिशा मिळत असून, पक्षाचा महिला वर्गातील आधार मजबूत होत आहे. यातून राज्यातील हजारो महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा:

बॅनर काढताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; कंपनीवर गुन्हा दाखल

आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार; विधीमंडळात आज शपथविधी

आईशप्पथ, काय नाचतेय ही!’; ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा धमाकेदार डान्स व्हायरल