दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी(students) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांसंबंधी काही म्हटवाचे बदल करण्यात आले आहेत. दहावीत प्रत्येक विषयात पास होण्यासाठी 35 गुण प्राप्त करणे आवश्यक असते. मात्र, आता दोन विषयांसाठी हा नियम बदलण्यात येऊ शकतो.

बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले,तरीही विद्यार्थ्याला (students) पुढील शिक्षण घेता येणार आहे. त्याला अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. मात्र, त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येईल. प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर असणार आहेत. याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.

पण, हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत तरतूद करण्यात आलीये.

या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय घातक निर्णय असल्याचं शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. जागतिक प्रतवारीचे जे अभ्यास होतात त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा ठरवला जातो. 2020 साली भारत हा 33 व्या क्रमांकावर होता. आता पुढच्या काळात तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळणार आहेत. यासाठी गणित आणि विज्ञान हे अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक विषय आहेत.

विद्यार्थ्यांना फक्त पास करण्यापेक्षा जास्त ज्ञान आणि कौशल्य मिळतील असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. गणितात पास करण्यापेक्षा गणिताची गोडी कशी लागेल, सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल? याचा विचार केला गेला पाहिजे, असं हेरंब कुलकर्णी म्हणाले आहेत.

“फक्त पदवीधरांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारने मार्कांशी खेळ करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना समग्र ज्ञान कसे मिळेल?, त्या विषयात तज्ञ कसे होतील? याचा विचार करणे आवश्यक आहे.”, असंही हेरंब कुलकर्णी म्हणाले आहेत.

हेही वाचा:

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार

वाढदिवसाच्या 2 तास आधी क्रिकेटपटूला मिळालं खास गिफ्ट

मोठी बातमी! टाटा समूहाचा तब्बल 55 हजार कोटींचा तगडा आयपीओ येणार