मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या जात आहेत. मुख्यमंत्री (political articles)लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांसारख्या योजनांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. असे असताना आता राज्य सरकारकडून मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही.
राज्य मंत्रिमंडळाची(political articles) महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या टोलबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कोणताही टोल द्यावा लागणार नाही.
मुंबईतील ऐरोली, वाशी, दहीसर, मुलुंड एलबीएस, आनंदनगर या टोलनाक्यांवर टोलमाफी जाहीर केली गेली आहे. ही टोलमाफी केवळ हलक्या वाहनांसाठीच असणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, चार महिन्यांपूर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही घोषणा असल्याचे म्हटले जात आहे.
आज रात्री बारा वाजल्यापासून सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेला हा टोलमाफीचा निर्णय केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
हेही वाचा:
घरात सुख-समृद्धी येण्यासाठी कोणती वास्तू आहे फायदेशीर?
आज अनेक शुभ योग; 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
‘गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर…’ मुश्रीफ कडाडले!