डेंजरझोनमध्ये जागा आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातील(earthquake) नेतेमंडळींचा विरोध डावलून भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांना होणारा विरोध दिवसागणिक वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी नाराज नेतेमंडळींसोबत बैठक घेतल्यानंतरही माढा मतदारसंघातला वाद निवळलाच नाही. या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या(earthquake) अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे उत्सुक होते. मात्र,महायुतीत भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवत तिथे विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली.यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून माढ्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली.पण या जागेवरुन भाजप उमेदवारी मागे घेण्याची शक्यता फारच कमी आहे.त्याचमुळे माढ्यात महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील 9 तारखेला प्रवेश करुन 15 तारखेला प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. अमावस्याच्यापूर्वी निर्णय नको म्हणून गुढी पाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील 9 तारखेला प्रवेश करुन 15 तारखेला प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. अमावस्याच्यापूर्वी निर्णय नको म्हणून गुढी पाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माढ्याचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत, तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप ठरत नाही. नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. 3 ) ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर गुरुवारी (ता. 4 ) दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे माढ्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
मोहिते पाटलांचा तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे माढ्यात नवा ट्विस्ट आला आहे. माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.
हेही वाचा :
फ्लावर नहीं फायर है फायर! ‘पुष्पा 2’मधील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
आता तुमच्या फोनमध्येच समजणार अनोळखी नंबरची ओळख; गुगल लवकरच देणार खास फीचर!