राजकारणात अडचणींचा सामना करत असलेल्या उद्धव ठाकरे(political) गटासाठी आजचा दिवस आणखी एक मोठी उलथापालथ घेऊन येणार आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

सांगली जिल्ह्यातून ठाकरे गटासाठी आज मोठा धक्का ठरणार आहे. कट्टर शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे(political) जिल्हाप्रमुख संजय विभुते, युवा सेनेचे प्रमुख तसेच अनेक तालुकाप्रमुख, सरपंच आणि शेकडो कार्यकर्ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास मुक्तागिरीवर सायंकाळी पाच वाजता हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
संजय विभुते यांनी स्पष्ट केलं की, पक्षात कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नाही आणि वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. सांगलीतील ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेला या घडामोडींमुळे मोठं खिंडार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटाला आधीच एकामागून एक झटके बसत आहेत, आणि हा नवा प्रवेश त्यात भर घालणारा ठरणार आहे.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी घडलेले दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा वर आले असून, यात आदित्य ठाकरे यांच्यावर नव्याने आरोप होऊ लागले आहेत. राजकीय विरोधक या मुद्द्यावरून टीका करत असून, या वादामुळे ठाकरे गटावर राजकीय दबाव वाढला आहे.
दुसरीकडे, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गट सोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यभरातून ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असून, संघटना मजबूत ठेवण्यात नेतृत्व अयशस्वी ठरत असल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी : माजी नगरसेवकासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक
मेहुणीसाठी दाजी झाला वेडापिसा, मित्राच्या मदतीने बायकोचा काढला काटा
मोठी बातमी! आता ट्रक, ट्रॅव्हल्सवर मराठीतच संदेश, परिवहन मंत्र्यांचा आदेश; गुढीपाडव्याचा मुहूर्त..