भ्रष्टाचाराला मदत (help)केली नाही म्हणून मिंधे सरकारकडून अधिकाऱयांना त्रास द्यायला सुरुवात झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टेंडर्स आणि खरेदीच्या बेकायदा कामांसाठी आरोग्यमंत्र्यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा आरोप पवार यांनी केला आहे.
तानाजी सावंत यांनी आपल्याला पुण्याच्या कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे करण्यास सांगितली होती. त्याचबरोबर इतर खरेदी प्रकरणातही दबाव आणला होता. आपण नकार दिल्यानेच त्यांनी मानसिक छळ करून आपले निलंबन केले, असे डॉ. पवार यांनी पत्रात म्हटले आहे.(help)
आरोग्य विभागात आपली 30 वर्षे सेवा झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱयांची आपल्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोरोना काळात पुण्यात आरोग्य अधिकारी म्हणून आपण उत्कृष्ट सेवा बजावली होती. त्याबद्दल आपला वेळोवेळी सत्कारही झाला होता, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. आपले कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असतानाही केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने निलंबन करण्यात आले आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझा मानसिक छळ सुरू होता आणि आरोग्य अधिकारी (प्रमुख), महापालिका पुणे हे पद रिक्त करण्यासाठी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने 29 एप्रीलला समिती स्थापन करुन चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करुन मला निलंबित करणेत आलेले आहे. प्रशासकीय चौकशी झालेली नाही तसेच आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे माझ्या कामकाजाबाबत प्रतिकुल शेरे नाहीत. तरी देखील शासनामार्फत माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले. माझे निलबंन हे माझ्या विरुध्द तक्रारीमध्ये तथ्य नसतांनाही त्रास देण्याच्या हेतूने व माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्र्यांच्या दबावामुळे केलेले आहे. या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावात आहे. निलंबन करित असताना, माझ्या सध्याच्या कार्यकालातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणने सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करुन माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी डॉ. पवार यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
हेही वाचा :
7 तासांत 15 निष्पाप मुलांचा बळी; सरकारी यंत्रणा ठरतेय फेल…
एक शो दोन विजेते, ‘Dance Deewane 4’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं….; शरद पवारांचा सर्वात मोठा खुलासा