एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?

राज्यात विधानसभा(latest political news) निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे अशातच विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे उद्या 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे.

मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी इच्छुक आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(latest political news) यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत. तसेच यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुद्धा आहेत. तसेच मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे इच्छुक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. त्यामुळे आता मंत्रिपद मिळवण्यासाठी राज्यातील आमदारांच जोरदार लॉबिंग सुरु आहे.

याशिवाय शिवसेना यावेळी नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळत आहे. तसेच अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना एकनाथ शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती देखील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय शिरसाट, विजय शिवतारे, योगेश कदम, भरत गोगावले आणि बालाजी किणीकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागच सरकार स्थापन झालं अगदी तेव्हापासून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा आहे.

मात्र यंदाच्या वर्षी तरी मंत्रिपद मिळावे असा दोघांचा प्रयत्न आहे. तसेच या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना भेट नाकारल्याच बोललं जात आहे. याशिवाय हे दोन्ही आमदार मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जोरदार लॉबिंग करत आहेत.

हेही वाचा :

“तिसरे महायुद्ध जवळ? नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीकडे जगाचे लक्ष”

“भाजपच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं हे ठरलं होतं”, दानवेंनी केला ‘मविआ’चा प्लॅन उघड

कुत्रा, मांजर चावलं, उपचारच घेतले नाहीत; 27 वर्षांच्या एकुलत्या एक मुलासोबत घडलं भयंकर