दुकानासमोर गाडी लावली म्हणून व्यापाऱ्याला बेदम मारहाण

टेंभुर्णी : आठवडा बाजारातील दुकानासमोर बुलेट गाडी का लावली म्हणून विचारणाऱ्या टेंभुर्णीतील मसाला विक्रेत्या व्यापाऱ्यास (businessman)जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिसात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दिनांक ४ रोजी सायंकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राजू कांबळे यांचे टेंभूर्णी आठवडा बाजारात वेशीच्या समोरील पुलावर मसाला विक्रीचे दुकान(businessman) होते. शुक्रवारी सायंकाळी यश जाधव व यश रामेश्वर सदाफुले यांनी दुकानासमोर बुलेट गाडी आडवी लावली. यावेळी गाडी समोर लावू नका असे सांगितले. त्यामुळे रागाने यश रामेश्वर सदाफुले, यश रामचंद्र जाधव, नामदेव मुंजाळ, रोहण शंकर पवार, कुशाल यात्वाप्पा साळुंखे, तेजस योगश जाधव, बाबा काळे, प्रदिप अशोक जाधव, जय रामेश्वर सदाफुले (सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांनी मारहाण केली.

नामदेवू मुंजाळ यांनी दगड डोक्यात मारला, तर कुश्शाल साळुंखे, बाबा काळे याने शुभमला मारहाण केली. त्याचे वडील राजू कांबळे हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही ढकलून देत जातीवाचक शिवीगाळ केली. कुशाल साळुंखे धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास करमाळा विभागाचे पोलीस अधिकारी अजित पाटील करीत आहेत.

टेंभूर्णी शहरात दहा ते वीस जणांच्या समुहाने एखाद्या कुटुंबातील नागरीकांना एकत्रित येवून कुटुंबावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये अनेक कुटुंबांना गावगुंडाचा फटका बसत असून यांची दादागिरी पोलिसांनी मोडीत काढावी, अशी मागणी टेंभूर्णीतील सर्वच स्तरातून होत आहे.

हेही वाचा:

बिबट्या बसच्या खिडकीतून शिरत होता अन् पुढं जे झालं…Video

शुटिंगदरम्यान मोठी दुर्घटना, गायिका जखमी; भिंती कोसळल्या अन्…; VIDEO व्हायरल

‘तुम्ही तिथे बसलात हे तर आमचचं पाप..’; मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी