आईच्या डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण… Viral Video

आई आणि तिच्या मुलाचं(son) नातं फार निर्मळ आणि घट्ट असत. तळहाताच्या फोडाप्रमाणे आई आपल्या मुलांची काळजी घेत असते. आपल्या पोटात नऊ महिने वाढवलेल्या आपल्या बाळाशी ती अशाप्रकारे जोडली जाते की मुलाच्या वेदना काही अंशी तिलाही जाणवू लागतात.

लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या(son) पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या मुलाला जरा जरी खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होऊ लागतो अशात आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या मुलाच्या अंगावरून जर गाडी गेली तर त्या आईचे काय होत असेल याचा विचार करा…

सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांना हादरवून सोडले आहे. अनेकदा गाडी चालवताना चालकांना रस्ते नियमांचे पालन करण्याचे आवाहन दिले जाते मात्र सर्वच हे नियम पाळत नाही आणि मग स्वतःच्या आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत.

आपला निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो याचा विचार लोक करत नाही आणि मग विनाकारण मृत्यूला बळी पडतात. सध्याच्या या व्हायरल व्हिडिओत एका कारचालकाच्या चुकीमुळे एका आईचं लेकरू गाडीखाली आल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, रस्त्याच्या कडेला एक आई आणि तीच लेकरू बसलं आहे. यावेळी तिथे एक कार रिव्हर्स घेत मागे येत असते. रिव्हर्स घेत असताना अचानक कार तिथे असलेल्या खांबाला आदळते आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलाच्या अंगावरून जाते.

हा धक्का इतका जोरदार असतो की यामुळे मागचा स्टँड देखील तुटून वेगळा होतो. आपल्या मुलाला गाडीने चिरडल्याचे हे दृश्य आई आपल्या उघड्या डोळ्यांनी बघते आणि दुसऱ्याच क्षणी त्याला वाचवायला पुढे धावते. सुदैवाने या घटनेत मुलाला फार दुखापत होत नाही आणि ती वाचतो. आपल्या मुलाला सुखरूप पाहून आईचा जीव हातात येतो आणि ती तात्काळ त्याला उचलत तेथून निघून जाते.

या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @ganeshnishad1585 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून हजारोंनी याला लाइक्स देखील दिले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे बावळट मागे बघ ना मागे कुणाचं तरी कुटूंब बसलं आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे सर्व काय झाले”.

हेही वाचा :

नेमेची येतो अर्थसंकल्प! जगण्याची लढाई नेहमीचीच

आणखी एका शिवसेना जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

BSNL सिमकार्डधारकांसाठी खुशखबर! सिम कार्डवर टीव्ही पहा मोफत