महाविकास आघाडीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल; कारवाईची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ(scam) झाली आहे. सुरुवातीला शौचालय ८ ते १० कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर नवा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील APMC पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शौचालय घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदे यांना(scam) अटकपूर्व जामीन मिळाल्यानं त्यांची अटक टळली होती. पण इतर काही संचालकांवर अटकेची कारवाई झाली होती. पण आता मसाला मार्केटमधील १३८ कोटींचा घोटाळा समोर आला आहे.

या घोटाळ्याची चौकशी मार्केटची प्रशासक मनोज सैनिक यांनी या प्रकरणाचा अहवाल तयार केला. यामध्ये ६५ कोटींच्या एफएसआयमध्ये फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. सन २००९ पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती पण यात गुन्हा दाखल होत नव्हता.

पण काल रात्री एपीएमसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, १२ एप्रिल रोजी शशिकांत शिंदे यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यामुळं या प्रकरणात कोर्ट काय निकाल देतंय हे महत्वाचं आहे.

दरम्यान, शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी होणार आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा आरोप करत तुम्ही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न करा पण आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे.

हेही वाचा :

उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

कोल्हापुरात लँडींगपूर्वीच मोदींचं शेतकऱ्यांना मोठ्ठं गिफ्ट

नरेंद्र मोदींच्या सभेला ‘ती’ व्यक्ती उपस्थित राहणार; कोल्हापुरात चर्चांना उधाण