अनेक लोकांची मोठा टीव्ही खरेदी करण्याची(smart tv deals) इच्छा असते, मात्र त्याची किंमत जास्त असल्याने सगळ्यांचं तो परडतो, असं नाही. अशातच तुम्हीही मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
फ्लिपकार्टच्या बिग(smart tv deals) सेव्हिंग्ज सेलमध्ये मोठ्या आकाराच्या टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही जवळपास निम्म्या किमतीत विकला जात आहे. यातच सर्वात स्वस्त 50 इंच 4K स्मार्ट टीव्हीची यादी आपण पाहणार आहोत.
2 GB रॅम, डॉल्बी ऑडिओ, बेझल-लेस स्क्रीन, WCG+ यांसारख्या फीचर्ससह असलेला हा 50 इंचाचा टीव्ही फ्लिपकार्टवर 22,990 रुपयांना विकला जात आहे. या टीव्हीची मूळ किंमत 43,999 रुपये आहे. हा टीव्ही आणखी स्वस्तात विकत घेण्यासाठी तुम्ही बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. 1500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि 3500 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट टीव्हीवर उपलब्ध आहे.
थॉमसनचा हा स्मार्ट टीव्ही, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब यासारख्या फीचर्ससह येतो. ग्राहक हा टीव्ही 24,999 रुपयांना खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट हा टीव्ही 40 टक्के डिस्काउंटसह विकत आहे. टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी (4K) 3840 x 2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 40W स्पीकर आहेत. या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि 400 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट आहे.
कोडॅक टीव्हीचा 2023 एडिशन टीव्ही सध्या फ्लिपकार्टवर 25,499 रुपयांना विकला जात आहे. हा टीव्ही HDR10+ आणि Dolby Atmos सह येतो. टीव्ही 3840 x 2160 पिक्सेलच्या अल्ट्रा HD (4K) स्क्रीनसह येतो. या टीव्हीवर 1250 रुपयांची बँक डिस्काउंट आणि 3500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहे.
हेही वाचा :
ओढ्यातील मृतदेह, दहशत आणि कुटुंबाची शोकांतिका!.
भारतातील निवडणुकांमध्ये खोडा घालण्यासाठी चीन करणार ‘एआय’चा वापर
सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार; विशाल पाटील यांचं जनतेला पत्र