त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- सनई चौघडे, टाळ मृदुंग अन् विठू नामाच्या गजरात (alarm) हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीत गुरुवारी (दि.२०) संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेव्हा वारी टळलेल्या भाविकांनी, ‘एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार..’ हा संत तुकारामांचा अभंग गात हात जोडले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. दोन किमी अंतरावर असलेल्या प्रयागतीर्थ पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडा येथे पालखीची पहिला मुक्काम पडला.
पालखी प्रस्थानाच्या वेळेस पावसाची हजेरी लागली (alarm). रिमझिम पावसात प्रस्थान झाले. सर्वत्र आनंदी वातावरण होते. धुक्यात बुडालेला ब्रह्मगिरी लक्ष वेधून घेत होता.
खासदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती
दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखी प्रस्थानासाठी खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांच्यासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष हभप कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, जीर्णोधार समन्वयक नीलेश गाढवे, पालखी सोहळा प्रमुख नारायण महाराज मुठाळ, प्रसिध्दीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, अॅड. सोमनाथ घोटेकर, माधव राठी, जयंत गोसावी, श्रीपाद कुलकर्णी, राहुल साळुंके यांसह सर्व विश्वस्त तसेच मानकरी बोलापूरकर महाराज, देहूकर महाराज, डावरे महाराज आदींच्या उपस्थितीत मानकरी, विणेकरी यांसह मान्यवरांचा नारळ, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मागर्दशनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे आणि सहकारी यांनी आपल्या कर्मचार्यांसह सर्व मार्गावर वाहने थांबणार नाही याची दक्षता घेत नियोजन केले होते.
हेही वाचा :
१० वी आणि १२ वी नंतर काय करावं?; जाणून घ्या मार्गदर्शन शिबिरातून..
बटाटा, कांदा, टोमॅटोनंतर आता डाळींच्या दरातही वाढ…
प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं…