मित्र कि शत्रू? पगारात फक्त 50 रुपये जास्त मिळाल्याने सहकर्मचाऱ्याचा डोक्यात दगड घालून खून!

एकाच ठिकाणी काम करणारे दोघेजण एकमेकांचे मित्रच असू शकतील असे नाही. कारण त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल आसुयादेखील असू शकते आणि याचे रुपांतर जीव घेण्यापर्यंत जाऊ शकते, हे एका घटनेतून समोर आलंय. नाशिकमध्ये हा संतापजनक प्रकार समोर आला असून अगदी क्षुल्लक कारणामुळे सहकर्मचाऱ्याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. पोलिस तपासात हत्येचे(murdered) कारण समोर आले असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. शांतीलाल ब्राह्मणे असे मृताचे नाव असून पोलिसांनी अधिकचा तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत डोक्यात दगड टाकून खून (murdered)झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष बाब म्हणजे हे दोघेजण एकाच ठिकाणी काम करणारे मित्र होते.ज्या ठिकाणी हे दोघं काम करत होते यातल्या एका जनाला दोनशे रुपये पगार होता. तर दुसऱ्याला दीडशे रुपये पगार होता. या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार कसा आणि मला 150 रुपये कसा? असा प्रश्न विचारात दोघांमध्ये झटापटी झाली. अवघे पन्नास रुपये जास्त असल्याने यात मयताचा खून झाला.

याप्रकरणी एकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात अटक करण्यात आले असून संतोष अहिरे असे संशयित ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

हेही वाचा :

पाच वर्ष लहान क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली कोहली करणार ‘विराट’ खेळी

आता नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार सेवेत; लांबचा प्रवास होणार सुकर

साईरत्न एंटरटेन्मेंटवर प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गीत प्रदर्शित