अंबरनाथ : पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात बांधकाम(construction) व्यवसायिकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात शिवमंदिर रोडवर मंगळवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान भररस्त्यात हत्येचा थरार घडला. यातील फरार आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींना अटक केली आहे.
जुने अंबरनाथ गाव येथील दुर्गादेवी पाड्यात राहणारे बांधकाम(construction) व्यावसायिक संजय श्रीराम पाटील (वय 53) यांनी 19 वर्षांपूर्वी अंबरनाथ एमआयडीसी परिसरात शांताराम पाटील यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन शांताराम पाटील यांनी इतर व्यक्तीला पुन्हा विक्री केली. याच जमिनीच्या मालकीवरून मृत संजय पाटील यांचे दुर्गादेवी पाडा येथील रहिवासी विलास पाटील, सूरज विलास पाटील आणि हर्ष सुनील पाटील यांच्याशी वाद सुरू होते.
याच वादातून शिवगंगा नगर परिसरात शिवमंदिर रोडवर रात्री दहा वाजताच्या दरम्यान आरोपी सूरज विलास पाटील आणि हर्ष सुनील पाटील या दोघांनी संजय पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. हल्लात गंभीर जखमी झालेल्या संजय पाटील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, घटनास्थळावरुन फरार झालेल्या आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी अंबरनाथ पश्चिम येथून अटक केली. यामध्ये आरोपी सूरज पाटील आणि हर्ष पाटील यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा:
कुटुंब रंगलय राजकारणात!
एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
काळ आला की मृत्यू अटळ आहे! पाहा वेळ आली माणूस कसा जाळ्यात अडकतो video