सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी(news) समोर आली आहे. आता एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस, ऑटो आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
राज्य परिवहन विभागाने दिलेल्या मंजुरीनंतर राज्य परिवहन वाहनांचे वाढीव दर आजपासून (२४ जानेवारी) लागू करण्यात आले. तर टॅक्सी आणि वाहन भाड्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून होणार आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० महिन्यांनंतर बैठक घेतली. ज्यामध्ये प्रवासी भाडे वाढवण्याचा निर्णय(news) घेण्यात आला. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एमएसआरटीसीने सादर केला होता, जो मंजूर करण्यात आला. या प्रस्तावात, एमएसआरटीसीने स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्रानुसार भाडे वाढवण्याची मागणी केली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की भाडे वाढवून दररोज होणारे २-३ कोटी रुपयांचे नुकसान भरून काढता येईल.
एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली.
या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचा(news) प्रवास महागला असून 15 टक्के दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकीटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजपासूनच (24 जानेवारी 2025) लागू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एसटी महामंडळात बसचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे आणि दररोज 55 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. एमएसआरटीसीकडे १५ हजार बसेसचा ताफा आहे जो भारतातील सर्वात मोठा बसेसचा ताफा आहे.
२०२२ मध्ये राज्य परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. ज्यामध्ये एमएसआरटीसीद्वारे चालवल्या जाणाऱ्या बसेसच्या भाड्यात १७.१७ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. जे त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये लागू करण्यात आले.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम ६० अंतर्गत, वर्षातून दोनदा एसटीए बैठक घेण्याची तरतूद आहे, परंतु काही वर्षांपासून असे होत नाही आणि यावेळीही दोन वर्षांहून अधिक काळानंतर असे होत आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या खाजगी बस मालकांनी भाडे वाढवले होते.
हेही वाचा :
सामंजस्य कराराचे फलित, कोल्हापूर मात्र सदैव वंचित
मोठी बातमी! रामदेव बाबांच्या पतंजलीला FSSAI चा दणका
…म्हणून अजित पवार कांकाच्या बाजूला बसण्याऐवजी 1 खुर्ची सोडून बसले; खरं कारण पवारांनीच सांगितलं