विधानसभा निवडणुकीच्या(political news todyas) तोंडावर शरद पवारांनी महायुतीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी एकापाठोपाठ एक धमाके करत महायुतीच्या अडचणी वाढवल्या आहे. भाजप, अजित पवार गटातील अनेक नेते तुतारी हात घेत आहेत. जागावाटपात संधी मिळत नसल्याचं लक्षात येताच अनेकांनी शरद पवार गटाची वाट धरली आहे. आता आणखी एक नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या(political news todyas) तोंडावर अजितदादांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसतंय. अजित पवारांचे खंदे समर्थक समजले जाणारे नाना काटे शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसणार आहे. नाना काटे यांचं जयंत पाटलांशी बोलणं झाल्याची माहिती आहे. नाना काटे समर्थकांसह मुबंईत शरद पवारांची भेट घेणार आहेत.
पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून या पट्ट्यातील प्रमुख नेते अजित पवार यांच्याशी निष्ठावान राहिले आहेत. नाना काटे हेदेखील अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
अजित पवार हे सध्या महायुतीसोबत असले तरी जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. अशात भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी न देता त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. अजितदादा यांच्यानंतर शरद पवार साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच, असं नाना काटे म्हणाले होते.
दरम्यान, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातही पिंपरी चिंचवड हा सर्वात कळीचा भाग मानला जातो. अजित पवारांसाठी पिंपरी चिंचवडचा गड महत्त्वाचा आहे. यामुळे अजित पवार आणि भाजपला चिंचवड विधानसभेत मोठा धक्का बसणार, हे उघड आहे.
हेही वाचा:
‘पुष्पा 2’ मध्ये होणार श्रद्धा कपूरची एंट्री…
मनोज जरांगे पाटील यांचं सोशल इंजिनियरिंग
दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास