प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला

मुंबईत दिवसाढवळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी(gold) चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री एमी एला हिची पर्स आणि सोनसाखळी चोरांनी हिसकावली. मुंबईतील कॉफी शॉप बाहेर ही चोरीची घटना घडल्याची माहिती आहे. अभिनेत्री एमी एलाची पर्स आणि सोनसाखळी चोरीला गेली आहे. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला
खारच्या ब्ल्यू टोकाई कॉफी स्टोइर स्टार बक्स येथे ही घटना घडली आहे. एमी एला रस्त्याने जात असताना मागून दुचाकीहून आलेल्या चोराने तिची बॅग हिसकावल्याची (gold)माहिती तिने पोलिसांना दिली. एमीने दिलेल्या तक्रारीनुसार, आता खार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमी एलाने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण सोबत ‘रन-वे 34’ या चित्रपटात काम केलं आहे.

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं
एमी एला भारतीय-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एमी एला डान्समुळेही कायम चर्चेत असते. तिच्या लॅव्हिश लाईफस्टाईल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. एमी एला अहमदाबादमध्ये राहत असून देशभरात तिने अनेक चाहते आहेत. एमी एला अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. एमी एला विकी कौशल स्टारर धर्मा प्रोडक्शनच्या ‘गोविंदा मेरा नाम’ चित्रपटामध्येही झळकली आहे. अजय देवगणच्या रनवे 34 चित्रपटामध्येही तिने काम केलं आहे.

हेही वाचा :

हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव

जिथे नात्यांची माती होते ते राजकारण काय कामाचे!

दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास