कोल्हापूर, 12 जुलै 2024: देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत(exam) कोल्हापूर विभागातून यंदा 40 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये करवीर तालुक्यातील गिरगाव येथील ट्रॅक्टर चालक शेतकरी रमेश पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याचा समावेश आहे. रोहितच्या या यशाने त्याच्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे.
शेतीच्या कामात हातभार लावत रोहितने तिसऱ्या प्रयत्नात सीए परीक्षा (exam)उत्तीर्ण केली आहे. लहानपणापासूनच सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रोहितने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजमधून उच्च शिक्षण घेत त्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. या प्रवासात त्याला सीए अमित गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
रोहितच्या यशाने त्याचे वडील रमेश पाटील आणि आई यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “पोरगं शिकतंय तर शिकू दे,” अशा साध्या विचारातून मुलाला प्रोत्साहन दिल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले. रोहितच्या यशाने त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“ध्येय निश्चित करून सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते,” असे रोहितने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या जिद्दीला आणि मेहनतीला दिले. रोहितच्या यशामुळे गिरगाव गावात आनंदाचे वातावरण आहे. या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपले करिअर घडवणार आहे.
हेही वाचा :
तुला शाळेतूनच काढतो, संचालकांच्या धमकीने विद्यार्थीची घरी जाऊन आत्महत्या
कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
तीन मोठे आयपीओ सूचिबद्ध होणार, गुंतवणूकदारांवर पडणार पैशांचा पाऊस?