धावत्या इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकत होता हात… video viral

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशनदरम्यान असणाऱ्या सर्विस रोडवरील एक व्हिडीओ(video) व्हायरल झाल्याने नवी मुंबईमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र सोमवारी पाहायला मिळालं. रस्त्यावर धावणाऱ्या एका इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने ही खळबळ उडाली होती. हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा एखाद्या व्यक्तीचा असून त्याचं अपहरण तर गेलं जात नसेल ना अशी शंका ही गाडी पाहणाऱ्याला आल्याशिवाय राहणार नाही. मात्र या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामागील सत्य समोर आलं आहे.

धावत्या इनोव्हामधून बाहेर लटकणारा हात हा मृत शरीराचा आहे किंवा कोणाचे अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झालाय याबद्दल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना शंका वाटत होती. एका वाहन चालकाने आपल्या कारमधूनच हात डिक्कीबाहेर लटकत असलेल्या इनोव्हाचा व्हिडीओ काढला आणि यासंदर्भात पोलिसांकडे देखील तक्रार दाखल केली. हा व्हिडीओ पाहून पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि व्हिडीओत दिसणाऱ्या कारच्या क्रमांकावरुन आधी कार आणि कार मालक शोधून काडण्यात आला. त्यानंतर हा प्रकार काय आहे याचा खुलासा झाला.

कारच्या डिक्कीतून बाहेर लटकणारा हात हा कोणत्याही मृतदेहाचा किंवा व्यक्तीचा नसून सदर व्हिडीओ केवळ मनोरंजनसाठी शूट करण्यात आलेला. एका रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी हा विचित्र प्रँक व्हिडीओ(video) शूट केल्याचे समोर आल आहे. सदर व्हिडीओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरुन तिचा शोध घेतला.

त्यानंतर या कारच्या मालकाकडून सदर प्रकार हा रील बनविणाऱ्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी रील बनवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी रील बनवण्यासाठी डिकीत बसलो आणि हात खाली लटकत ठेवला होता असं मुलांनी पोलिसांना सांगितलं. तसेच हा व्हिडीओ कसा शूट केला याचा बिहाइंड द सीन प्रकारचे व्हिडिओ देखील त्यांनी पोलिसांनी दाखवले.

मात्र रील बनवण्याच्या नादात समाजात भीती निर्माण करण्याचे काम तरुणांनी केले असून या तरुणांवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video

लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

ठाकरेंना आणखी एक धक्का! कोल्हापुरातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश;