कोल्हापुरातील शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला

सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्हिडीओ(monkeys) थेट आपल्या मोबाईलवर येतात. त्यातील काही मजेशीर असतात, जे आपण पाहून पुढे ढकलतो. पण काही व्हिडीओ हे थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय. जो पाहून पालक वर्गाचा थरकाप उडू शकतो. कारण आपली मुले शाळेत जातात ती जागा सुरक्षित आहे का? असा प्रश्न त्यांना पडू शकतो.

कोल्हापुरातील तवणाप्पा पाटणे हायस्कूल समोर एक गंभीर प्रकार घडला. या ठिकाणी खेळत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर माकडाच्या(monkeys) कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तीन विद्यार्थी जिवाच्या आकांताने धावताना दिसतायत. त्यातील पहिला विद्यार्थी वेगाने पळाला, तिसरा विद्यार्थी एका बाईक वाल्याच्या मागे लपला पण दुसऱ्या विद्यार्थ्याचा माकडाने पाठलाग केला. तो विद्यार्थी पाय अडकून खाली पडला. माकडाने त्याला जोरदार धडक दिली. माकडाने विद्यार्थ्यावर हल्ला चढवला. आजूबाजूला आरडाओरडा झाला. यानंतर माकड पुन्हा मागे पळून गेले. हे सर्व इतक्या कमी वेळात झाले की हल्ला करून माकडं पळूनदेखील गेली.

कोल्हापुरातील राजारामपुरी दहाव्या गल्लीत असलेल्या पाटणे हायस्कूल समोर काही मुलं शनिवारी दुपारी खेळत होती. त्याचवेळी शाळेच्या परिसरातील झाडावर बसलेल्या माकडांच्या कळपाने अचानकपणे इथल्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. शौर्य भोसले हा विद्यार्थी पळून बाजूला जात असताना माकडाने पाठीमागून त्याच्या अंगावर उडी मारली.

शौर्य जोरात रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. नागरिकांनी या माकडांना हुसकवून शौर्याची सुटका केली, पण या मध्ये शौर्य जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. माकडाने विद्यार्थ्यांवर केलेला हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आलाय. पुन्हा असे हल्ले होऊ नयेत म्हणून माकडांना वेळीच आवर घालण्याची मागणी वनविभागाकडे केली जात आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट.. थरारक VIDEO व्हायरल

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ 14 तास होणार? आयटी कंपन्यांच्या प्रस्तावावर सरकार निर्णय घेणार