DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video

आयपीएल 2025 चा सीजन जबरदस्त सुरु आहे. प्रत्येक सामना रोमांचक होत आहे. आयपीएलची क्रेझ संपूर्ण भारतात आहे. प्रत्येक सामन्यात(match), स्टेडियममध्ये चाहत्यांमध्ये स्पर्धा दिसून येते. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यातही असेच काहीसे दिसून आले.

चाहतेही त्यांच्यात स्पर्धा करत असतात. पण दरम्यान, एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चाहते मारामारी करताना दिसले.अगदी लाथा आणि मुक्काही बघायला मिळाला. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतानाही दिसले.

सामन्यानंतर(match) चाहत्यांमधील हे जोरदार भांडण बघायला मिळाले. सगळ्यात आधी चाहत्यांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली. हे भांडण पाहून बाकीच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला. या हिंसक भांडणात एक महिला चाहती देखील सहभागी होती. या मारामारीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या हिंसक मारामारीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

दिल्ली आणि मुंबई यांच्यात एक दमदार लढत पाहायला मिळाली. मुंबई संघाने दिल्लीच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. शेवटी, दिल्लीला फक्त १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या ५ षटकांत सामन्याने वळण घेतले आणि सलग तीन धावबाद झाल्याचे दिसून आले.

दिल्लीकडून करुण नायरने शानदार खेळी केली. पण त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. त्याने फक्त ४० चेंडूत ८९ धावांची खेळी केली. पण दिल्लीच्या थिंक टँकने सामना बदलला. या विजयाचे श्रेय नायरला मिळू शकले नाही. दिल्लीला आयपीएल २०२५ मध्ये पहिला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरला.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

ठाकरेंना आणखी एक धक्का! कोल्हापुरातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश;

नाहीतर तुमचंं रेशन कार्ड बंद होणार…; शेवटच्या १५ दिवसांत हे काम कराचं