महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतून घेण्यात आला मोठा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार(decision) असल्याचे सांगितले जात होते. याबाबतच्या चर्चा देखील सातत्याने सुरु होत्या. असे असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. दिल्ली भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नसल्याचे आता सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे सरकार(decision) सत्तेत आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झाले तेव्हापासून अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे दिसत होते. असे असताना राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतर विस्तार केला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट, अजित पवार गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आता हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, असा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक आमदारांचे स्वप्न भंगलं आहे. जरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसला तरी येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्ताही यावेळी केल्या जातील असं बोललं जात होतं. मात्र, भाजप हायकमांडने महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या रखडलेल्या नियुक्त्या केव्हा होणार हादेखील आता प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

विशाळगडावर घडलेली घटना ही दुर्दैवी! शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध …

ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कडून आषाढी एकादशी निमित्त शाबू खिचडीचे वाटप