बीड: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण(political earthquake) रंगले आहे. राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये वादंग देखील झाला.

या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपपत्रामध्ये हेच लिहिण्यात आले असून मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यामध्ये संबंध असल्याचे बोलले जात आहे. मागील तीन महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीना
म्याची मागणी केली जात आहे. यासंबंधात राजकीय वर्तुळामध्ये मोठा गौप्यस्फोट होणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीमधून देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची(political earthquake) मागणी करण्यात आली. भाजप नेते व आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच राजीनाम्याची देखील जोरदार मागणी केली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद देखील नाकारण्यात आले.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील, समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. यावर आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची थेट तारीख सांगितली आहे.
करुणा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे उद्या, 3-3-2025 रोजी राजीनामा देतील असा दावा करणारी फेसबुकवर पोस्ट केली आहे. तर याच पोस्टमध्ये अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेतल्याचा दावा केला आहे. याविषयी अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र करुणा मुंडे यांच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर आता खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील गंभीर दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या दाव्यावर खासदार सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपण करूणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट वाचली नाही. त्यांचा दावा माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कळला आहे. करुणा ताईंना कुठून माहिती मिळाली माहिती नाही. पण खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असेल तर ‘देर है पर अंधेर नही’, असंच म्हणावं लागेल, असे ते म्हणाले. असं जर झालं असेल तर त्यांचे स्वागतंच असल्याचे देखील खासदार बजरंग सोनावणे यांनी सांगितले. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे.
हेही वाचा :
भयानक रस्ता अपघात; दोन बसच्या धडकेत 37 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
प्रतिक्षा संपली! Samsung चे 3 दमदार स्मार्टफोन्स अखेर लाँच
शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला