ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट

राज्यात पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. अशातच (Congress)काँग्रेसच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.

नागपूर ग्रामीण(Congress)काँग्रेसच्या सहा प्रमुख पदाधिकार्‍यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडल्याचे चित्र आहे.

उमरेड पंचायत समितीतील सभापती गीतांजली नागभीडकर आणि उपसभापति सुरेश लेंडे, पंचायत समिती सदस्य दादाराव मांडसकर, पंचायत समिती सदस्य प्रियंका लोखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर भिवापूर पंचायत समितीचे उपसभापती राहूल मसराम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सोबतच उमरेड बाजार समितीचे संचालक भिकाजी भोयर यांनी ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय.

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारूण पराभव झाला. तर महाविकास आघाडीला भरघोस मतदान मिळत दणदणीत विजय मिळाला होता. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले.

तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यानंतर महाविकास आघाडातील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मविआला टोला लगावला. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असे म्हणत त्यांनी मविआला घरचा आहेर दिला.

यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना स्वबळाचा नारा दिला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडल्याचे चित्र आहे.

नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

‘व्होट जिहाद’ पार्ट 2 वर फडणवीसांचा इशारा; राज्यातील राजकीय वातावरण तापलं

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! 2 दिवसांत पीक विमा नोंदणी कशी कराल?

क्रिकेटपटूची विमानतळावर गैरवर्तणूक; चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर सोशल मीडियावर