पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. खासगी (doctor)उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या विवाहित महिलेवर, रुग्णालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पाटस पोलीसांनी वरवंड येथील डॉक्टरला अटक केली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. डॉ. सुनिल नामदेव झेंडे मुळ रा. दिवे, ता. पुरंदर जि. पुणे, सध्या रा. वरवंड ता. दौंड जि. पुणे असे या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड येथील धन्वंतरी अँक्युप्रेशर सेंटर आयुर्वेदिक दवाखान्याचा डॉक्टर सुनील झेंडे याच्या रुग्णालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला ही पाठीवर गाठ आल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी दवाखान्याच्या आतील खोलीत घेऊन अत्याचार त्याने केला. याबाबत कोणाला सांगू नकोस नाहीतर, मी तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली.
दरम्यान त्यानंतर आरोपी डॉक्टरने २१ ऑगस्ट २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. ही फिर्याद पीडित महिलेने पाटस पोलीस चौकीत दिल्याने मंगळवारी दि.१० संबंधित डॉक्टरवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरला पाटस पोलिसांनी अटक केली असून, बुधवारी दि.११ दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजे १६ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा(doctor)फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते वय 26 याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित (doctor)विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
हेही वाचा :
न्याय व्यवस्थेची अप्रतिष्ठा?
एका सेकंदात कासवाने गिळला जिवंत खेकडा…Viral Video
भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी सामना रद्द होणार?
काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?