अल्पवयीन मुलींवरील(girl) अत्याचाराच्या घटना काही थांबता थांबेनात. निवडणूक काळात आळा बसलेल्या अत्याचाराच्या घटना, आचारसंहिता संपल्यानंतर आता समोर यायला लागल्या आहेत. मुर्तीजापुर तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेली अत्याचाराची ही दुसरी घटना आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन(girl) मुलीचे ३ डिसेंबर रोजी दोनअज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास अपहरण केल्याची तक्रार आल्यावर, अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला पुण्यात नेले. आणि तिथे मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेविरोधात पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत सहा डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार डिसेंबरला सकाळी झोपेतून उठल्यावर मुलगी घरात दिसून न आल्यामुळे घरच्यांनी मुलीची शोधा शोध सुरू केली. नातेवाईकांकडेही तिचा शोध घेतला गेला. परंतु तिचा कुठेही तपास न लागल्यामुळे अल्पवयीन पीडितेच्या परिवाराने पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली. त्यावर पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी हे मुर्तीजापुर तालुक्यातील जामठी येथील असून इर्शाद शाह नासिर शाह वय वर्ष २१ तर दुसरा आरोपी राजा उर्फ शारीक शाह वय वर्ष २१ अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिला, आधी नागपूर व तेथून पुण्याला घेऊन गेल्याची माहिती मिळाली.
त्यातील एक आरोपी अहिल्यानगर वरून पुन्हा आपल्या गावी आला, तर दुसरा आरोपी हा अल्पवयीन पीडितेला घेऊन पुण्याला गेला. तिथे त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेनी पोलिसांना सांगितलेल्या आपबीतीनुसार लग्नाचं आमिष दाखवून मुलीच्या स्वगावी सुद्धा तिच्यावर तीन-चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध बी एन एस कलम १३७ (२), ६४ (२)(एम),७४,७५,७८,९६, ३ (५), सहकलम ४,५ एल,६, ८, १२,१७ पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोसे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे, अमलदार उमेश हरमकर, आकाश काळे महिला पोलीस जयश्री मेंढे हे करीत आहेत.
हेही वाचा :
रील बनवताना आईचे मुलीकडे दुर्लक्ष झाले अन् चिमुकली रस्त्यावर…VIDEO
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, आता मलायका पुन्हा प्रेमात? ‘या’ कुल बॉयसोबतचा फोटो समोर
BEST बसचालक दारू पिल्याचा आरोप; शिवसेना आमदाराने सांगितलं खरे सत्य, म्हणाले ‘घाबरून त्याने…’