पतीचे विम्याचे पैसे मिळावेत म्हणून एका पत्नीनं मुलाच्या (shocking)मदतीनं पतीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर हत्येचा बनाव रचला. या घटनेचा तपास केला असता पत्नीनं पतीची हत्या केली असल्याचं समोर आलं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. पाटील यांच्यावर कर्जाचं ओझं होतं. कर्ज फेडण्यासाठी एका महिलेनं आपल्या पतीची (shocking)हत्या केली आहे. कारण पतीच्या विम्याच्या पैशांवर पत्नीचा डोळा होता. हेच पैसे घेऊन पत्नीला कर्ज फेडायचे होते. यासाठी तिनं मुलगा आणि मित्राला मदतीला घेऊन पतीची निर्घृण हत्या केली.
बाबूराव दत्तात्रय पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी वनिता बाबूराव पाटील, मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि महिलेचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान अशी आरोपींची (shocking) नावे आहेत.महिलेनं आधी पतीच्या हत्येचा कट रचला. नंतर याची माहिती मुलाला आणि मित्राला दिली. प्लान प्रमाणे त्यांनी पतीची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर हत्येचा बनाव रचला. पण पोलीस तपासात पत्नी, तिचा मुलगा आणि मित्राने हत्या केली असल्याचं उघडकीय झालं.
हेही वाचा :
‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत
‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग
खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या