इचलकरंजी : “चाळके गटाचा महाविकास आघाडीला दणका? ‘घड्याळा’सोबत राजकीय नवा प्रवास सुरू!”

इचलकरंजी: इचलकरंजीतील राजकारणात(political) स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवक सागर चाळके गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दिशेने ठाम पाऊल टाकल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत हा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करेल, अशी माहिती समोर आली आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चाळके गटाने यापूर्वी महाविकास आघाडीसोबत काम केले असून विधानसभा(political) व लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडी उमेदवारांसाठी प्रचार केला होता. मात्र, आता या गटाने नवा राजकीय मार्ग स्वीकारण्याचे ठरवल्याने महाविकास आघाडीला काहीसा धक्का बसण्याची शक्यता आहे.

चाळके गटाचा ‘मँचेस्टर आघाडी’पासून ‘घड्याळा’कडे प्रवास

चाळके गट हा सध्या ‘मँचेस्टर आघाडी’च्या नावाखाली कार्यरत आहे. याआधी त्यांनी ताराराणी आघाडीचा भाग म्हणून स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका निभावली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शहरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

शुभेच्छा भेटीने दिला संकेत

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापुरातील जिल्हा बँकेत भेट देऊन शुभेच्छा दिल्यानंतर चाळके गटाच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. यावेळी स्वतः सागर चाळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली.

महाविकास आघाडीला बसणार फटका?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चाळके गट हा महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक राहिला आहे. या गटाने साथ सोडल्यास महाविकास आघाडीला स्थानिक पातळीवर फटका बसण्याची शक्यता आहे.

राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता

नवीन वर्षात चाळके गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश महापालिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. स्थानिक पातळीवरील आणखी काही गट आपल्या राजकीय भूमिका बदलतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे वस्त्रनगरीतील राजकारणाच्या दिशाच बदलणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा :

आता 10 मिनिटांत किराणा घरपोच मिळणार…

कोल्हापुरात वाहून गेले, कर्नाटकात सापडले; 4 महिन्यांनी आढळला मृतदेह

‘पुष्पा 2’ पाहायला गेला आणि चांगलाच फसला, सिनेमागृहात एकच थरार