पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील ( school)वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला तो वाद विकोपाला आणि हा प्रसंग जिवावर बेतला आहे. शाळेतील वार्षिक समारंभावरुन वादावादी झाल्यानंतर नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर भागातील मांजरी भागतील एका शाळेमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी 14 वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याघटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मांजरीतील एका शाळेत ( school)तक्रारदार मुलगा नववीत शिकायला आहे. गुन्हा दाखल झालेला मुलगा देखील त्याच्याच वर्गात शिकायला आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. या वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी अडीचच्या सुमारास जखमी मुलगा वर्गात बसलेला होता. तेव्हा आरोपी मुलगा अचानक पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला.
मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली. एकच गोंधळ उडाला. मुलांनी शिक्षकांना घटनेची माहिती दिली. शिक्षकांनी मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गळ्यावर वार केल्यानंतर देखील तो त्याला धमकावत होता. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे. हडपसर पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत. या शाळेतील आणखीन कोणाला अशा पद्धतीने दमदाटी केली जात आहे का याचा देखील विचार पोलीस करत आहेत.
वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये वाद झालेला होता. मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास मुलगा वर्गात बसलेला असताना त्याचवेळी वर्गातील दुसरा मुलगा पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. गळ्यावर वार केल्यानंतर देखील तो त्याला धमकावत होता. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत तो जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली, वर्गात एकच गोंधळ उडाला आणि त्यांनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिली आहे. त्यानंतर तत्काळ जखमी मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे
हेही वाचा :
कवठे महाकाळमध्ये रोहित पाटील पिछाडीवर
अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर
‘या’ मार्गिकेवरील प्रवाशांना होणार फायदा