मांजरीला वाचवत होता व्यक्ती, तितक्यात समोरून आला ट्रक अन्… क्षणातच गेला जीव; Video Viral

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा असे व्हिडिओ(video) शेअर केले जातात, ज्यातील दृश्ये पाहून आपले होश उडतील. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका भयानक अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. केरळमध्ये एक भीषण अपघात घडून आला ज्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर शेअर केला गेला आहे. ही घटना केरळमधील त्रिशूरमध्ये घडून आली. यात व्यक्तीची अवस्था पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

तर घडलं असं की, रस्त्यावर अडकलेल्या एका मांजरीला वाचवण्यासाठी दुचाकी थांबवणाऱ्या एका तरुणाचा ट्रक आणि कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. मृताचे नाव शिजो असे आहे, तो कल्लाटोडचा रहिवासी होता. मंगळवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. ही संपूर्ण घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

व्हिडिओमध्ये(video) असे दिसून येते की रस्त्यावरील मांजरीला वाचवण्यासाठी शिजोने त्याची बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली आणि वेगाने येणाऱ्या ट्रकला थांबण्याचा इशारा करत मांजरीकडे धावला. ट्रक चालकाला काही समजण्यापूर्वीच ट्रकने शिजोला धडक दिली. धडक होताच, शिजो जमिनीवर पडला आणि समोरून येणाऱ्या गाडीच्या टायरखाली आला. त्याला ताबडतोब त्रिशूरमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. घटनेपासून ट्रक चालकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलीस आता याप्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ @INNChannelNews नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘केरळमध्ये मांजरीला वाचवताना ट्रकने धडक दिल्याने ४२ वर्षीय वृद्धाचा दुःखद अंत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून सर्वचजण हादरले असून आता हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

हेही वाचा :

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; पुरवठा विभागाची मोठी कारवाई

तहवूर राणाचे प्रत्यार्पण भारताचे राजनैतिक यश

मासिक पाळी आल्याची शिक्षा, वर्गाबाहेर काढलं; पायऱ्यांवर बसून विद्यार्थिनीने दिली परीक्षा