दिव्यांगांना सुखद धक्का…,एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण

एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास असे म्हटले जाते. म्हणून प्रवासासाठी एसटी(st) बसलाच प्राधान्य दिले जाते. त्यात आता एसटी महामंडळाने महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिल्यापासून एसटी बस नेहमी फुल जात आहे. त्यात दिव्यांगासाठी राखीव असलेल्या जागांवर ही अन्य प्रवासी बसतात. त्यामुळे दिव्यांगांना जागाच मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या(st) सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल,तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल. याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य दयावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आलेली आहेत.

हेही वाचा:

जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सची घोषणा, एक्स्ट्रा डेटा

आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! महिलांना मिळणार 50000 रुपये, काय आहे नेमकी योजना?