नागपुरमध्ये आज एक मोठी दुर्घटना टळली. नागपुरातील खापरखेडा रेल्वे(train)रूळ क्रॉसिंग करताना गेट बंद झाल आणि 40 विद्यार्थी घेऊन जाणारी बसमध्येच अडकली. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग मात्र सुदैवाने मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे ट्रेन थांबली अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काय घडलं नेमकं?
नागपुरातील खापरखेडा रेल्वे (train)रूळवर क्रॉसिंग करताना अचानक गेट बंद झाल्याने ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळावरच अडकली. समोरुन येणारी भरधाव ट्रेन आणि मध्येच बस अडकल्याने नेमकं करायचं काय? असाच प्रश्न सर्वांना पडला. मात्र नागरिकांसह रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रेन थांबली आणि मोठी दुर्घटना टळली.
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्गावर ही घटना चार वाजताच्या सुमारास घडली. खापरखेडा रेल्वे रूळावर एका बस चालकाने गेट बंद होत असतानाच रुळ क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे गेट अचानक बंद झाल्याने बसमध्येच अडकली. ४० विद्यार्थ्यांसह बसमध्येच अडकल्याने सर्वजण घाबरुन गेले.
यावेळी काही नागरिकांनी सतर्कता दाखवत समोरुन येणाऱ्या ट्रेनला अलर्ट देण्यासाठी रेल्वे रुळावार लाल रंगाचे कठडे ठेवले. रेल्वे चालकानेही धोक्याचा इशारा ओळखत ट्रेन थांबवली अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर एक गेट उघडून बस बाहेर काढण्यात आली. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग होता, मात्र नागरिकांच्या आणि रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा :
शिराळ्यातील शेतकऱ्यांच्या ५७ वर्षांच्या प्रश्नावर तोडगा निघाला
नव्या जर्सीमध्ये टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय, चाहते म्हणाले “अभिमानास्पद क्षण”
दहा दिवसांच्या बाळासह मातेची पुरात अडचण, प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा