मोठी बातमी ! भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वीच धक्का; ‘या’ माजी खासदाराने सोडली साथ

पुणे : राज्यात विधानसभा(political) निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानुसार, येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात अनेक नेतेमंडळींकडून पक्षांतर केले जात आहे. असे असताना आता भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार धक्का बसला आहे. एका माजी खासदाराने साथ सोडली आहे.

सध्या नेतेमंडळींकडून पक्षबदल केले जात आहेत. त्यात भाजप (political)सोडून अनेक नेतेमंडळी इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. असे असताना आता भाजपचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबाबतची माहिती स्वत: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले असून, त्यामध्ये ‘माजी खासदार श्री. प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भक्कम साथ लाभेल, याची खात्री आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो’.

सध्या महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रमुख राजकीय सामना पाहिला मिळणार आहे. त्यात इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे जाणार होती. त्यामुळे आपल्याला महायुती तिकीट देणार नाही, यामुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (25-10-2024) : Horoscope

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?, मोठी माहिती समोर

नोव्हेंबरमध्ये ‘या’ दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर! राज्य सरकारचा आदेश