पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर येथील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना(students) विषबाधा झाल्याची घटना आज घडली आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना चक्कर आली आहे. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले आहेत. मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड येथील शाळेत हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे पालक वर्गही हादरला आहे. ही घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांना(students) तातडीने रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांना निष्कृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या शाळेच्या प्रशासनावर देखील थेट कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
शाहू नगरच्या डी वाय पाटील शाळेमध्ये आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. त्यावेळी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच खाण्यासाठी दिले होते. यावेळी निकृष्ट दर्जाचे सँडविच विद्यार्थ्यांना दिल्यामुळे त्यामधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. तसेच यावेळी स्कूल प्रशासन आणि पालकांनी देखील काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी काही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, या घटनेबाबत डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाची भूमिका देखील समोर आली आहे. तसेच सकाळी देखील विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती.
तसेच ब्रेड आणि चटणी खाऊन तब्बल 350 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे प्रशासनाने देखील म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारची डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाने देखील दिलगिरी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
दांडियाच्या कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…
नागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट
वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा दांडिया की लोक पाहतच राहिले