शेततळ्याकडे फिरण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू(farm) झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीमध्ये घडली. हर्ष अतुल सुखदेव आणि आदित्य अतुल सुखदेव अशी दोन्ही भावंडांची नावे आहेत. सांगलीच्या तासगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हर्ष अतुल सुखदेव (वय, 16) आणि आदित्य अतुल सुखदेव (वय 12) दे दोघेही भाऊ आपल्या आई-वडिलांसह मुंबईहुन(farm) नेहरुनगरमध्ये राहतात. सध्या ते उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त सांगलीला आपल्या गावी आले होते. शनिवारी हे दोघे भावंड घरात कोणालाही न सांगता शेतातील शेततळ्याकडे गेली.
यावेळी दोघेही पायघसरून शेतातील शेततळ्यात पडले, ज्यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन या दोघा भावंडांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हर्ष आणि आदितच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या आई- वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
MS धोनीमुळे हरली CSK? ‘या’ मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून
प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी
इचलकरंजीतील प्लेटींग कारखान्याला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान