भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना वाहन खोल दरीत (border)कोसळल्याने शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ मलकापूर येथील जवान सुनील विठ्ठल गुजर (वय 27) यांना वीरमरण आले. आपल्या सहा महिन्याच्या मुलाची भेट घेण्यासाठी ते आतुर होते, मात्र नियतीने त्यांची ही इच्छा अपूर्ण ठेवली. कर्तव्यावर असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.

कर्तव्यावर असताना वीरमरण
मणिपुरमध्ये भूस्खलन झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना सैन्यदलाचे वाहन सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळले, यात सुनील गुजर यांना वीरमरण आले. पुण्यातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुपमध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मणिपूर येथे 110 बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. देशसेवेसाठी त्यांचे निष्ठेने कार्य सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
सुनील यांचा विवाह 2022 मध्ये स्वप्नाली पाटील यांच्यासोबत झाला होता. गेल्या आठ महिन्यांपूर्वी ते काही दिवसांच्या रजेवर गावी आले होते. पत्नीला जास्त वेळ देता यावा म्हणून अतिरिक्त(border) सुट्टीसाठी ते प्रयत्नशील होते. मात्र, कुटुंबाला भेटण्याआधीच त्यांना वीरमरण आले.
सुट्टीसाठी प्रतीक्षा, मुलाची भेट अपूर्णच
सुट्टी मंजूर होण्यासाठी सुनील अनेक दिवस वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची रजा मंजूर झाली होती, आणि 11 मार्चला ते गावी येणार होते. यासाठी पत्नी स्वप्नालीही आपल्या माहेराहून सासरी परत आल्या होत्या. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांच्या सुट्टीत बदल झाल्यामुळे ते घरी पोहोचू शकले नाहीत.
चार दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी आणि घरच्यांशी बोलणे झाले होते. ते(border)आठ दिवसांत घरी येऊन गावची जत्रा करूनच परत जातील, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, नियतीने वेगळेच ठरवले. कर्तव्यावर असतानाच त्यांचे निधन झाल्याने बापलेकाची भेट कायमची अपूर्ण राहिली. आपल्या मुलाला जवळ घेण्याची, त्याला डोळे भरून पाहण्याची संधी सुनील यांना मिळाली नाही. कुटुंबासह संपूर्ण गावाने त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठा निर्णय…
कोल्हापूर-सांगली महामार्ग बंद करण्याचा इशारा, राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
इतका माज येतो कुठून? मद्यधुंद अवस्थेत तरुणाने चौघांना उडवलं Video Viral
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार?