मुंबई : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा(cabinet) विस्तार रविवारी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर मोठा आरोप केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या एका प्रकल्पावर आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले असून, त्यांनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
आशिष शेलार यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात सहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते सिमेंटीकरण प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे(cabinet). त्यांनी लिहिले की, “मुंबईत गेल्या वर्षीपासून सुरू झालेली ६,००० रुपयांची सिमेंट काँक्रीटची कामे आणि सध्या सुरू असलेल्या छोट्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांसंदर्भात मी लिहित आहे.
माझ्या विधानसभा मतदारसंघातील सांताक्रूझ पश्चिम भागात बुधवारी रस्त्याच्या पाहणीदरम्यान मला असे आढळून आले की, नुकत्याच बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत आणि नुकतीच सुरू झालेली रस्त्यांची कामेही नीट होत नाहीत.
आशिष शेलार पुढे लिहितात की,”निकृष्ट दर्जाचे काम आणि काँक्रिटीकरणाच्या खराब कामांच्या अनेक तक्रारींनंतर, कामाच्या गुणवत्तेच्या बाबींची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी माझी मागणी आहे. तसेच काँक्रीटच्या 40 टक्के रस्त्यांच्या पॅचचे आयटी बॉम्बे, व्हीजेटीआय मधील तज्ञांकडून तपशीलवार ऑडिट व्हायला हवे.
गुणवत्ता नियंत्रण, दक्षता प्रक्रिया आणि कंत्राटदाराच्या कामातील त्रुटींची चौकशी झाली पाहिजे. चौकशीच्या आधारे, चुकीच्या रस्त्याच्या कंत्राटदारांवर दंड आणि निष्काळजी संस्था, अधिकारी यांच्यावर काळ्या यादीत टाकण्यासह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा :
मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली अन्…
खुशखबर! राधिका आपटेच्या घरी पाळणा हलला, दिला गोड मुलीला जन्म
उद्या रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या सर्व माहिती