भाजपमध्ये(BJP) प्रवेश केलेल्या माजी नगरसेेवकांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचे विधान केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रीया उमटली आहे. मंत्री उदय सामंत यांनी तिथे तुम्हाला उमेदवारी मिळेल का याची काळजी करावी, फुकटची मते व्यक्त करू नयेत असा टाेला या माजी नगरसेवकांना लगावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही भाजपने त्या नगरसेवकांना तंबी द्यावी असा इशारा दिला आहे.

ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत (BJP)भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाच माजी नगरसेवकांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचे विधान केले हाेते. यावरून आता शिंदे शिवसेना आक्रमक झाली आहे.
विश्व मराठी भाषा संमेलनाच्या नियोजनसाठी म्हणून सामंत पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या ५ माजी नगरसेवकांचा समाचार घेतला. ते तिकडे गेले त्याविषयी काही म्हणायचे नाही, मात्र जाताना त्यांनी विनाकारण खरी शिवसेना ठाकरेंचीच असे मत व्यक्त केले.
असे बोलण्याचा त्यांचा संबध काय? ज्या पक्षात ते गेले आहेत तिथे उमेदवारी मिळेल का याची काळजी त्यांनी करायला हवी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत, अशी मागणीही सामंत यांनी केली.
दरम्यान शिंदेसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही त्या ५ जणांच्या या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ५ ही जणांवर टीका केली. शहर उपप्रमुख सुधीर कुरूमकर यांनी सांगितले की, खरी शिवसेना कोणती हे सांगण्यासाठी या ५ जणांच्या दाखल्याची कोणालाच गरज नाही.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमच्या शिवसेनेला भरघोस मतदान करून खरी शिवसेना कोणाची हा निकाल आधीच दिला आहे.

अभिजित बोराटे यांनी सांगितले की, त्या ५ जणांचा भाजप प्रवेश सत्तेच्या मोहापोटी झालेला आहे. भाजप व आमची युती आहे. त्यामुळे त्या ५ जणांचे तोंड बंद करण्याची जबाबदारी आता स्थानिक भाजप नेत्यांची आहे.
त्यांनी ते केले नाही तर त्यांचे तोंड आम्ही बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. विशाल सरोदे, प्रदीप धिवार व अन्य पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
हेही वाचा :
तूरडाळ म्हणून लाख डाळ विकणारी टोळी व्यापाऱ्यांनी पकडली; लाख डाळ शरीराला हानिकारक
इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळालं स्थान
मृत्यूपश्चातही सुरक्षित राहतील तुमचे Facebook-Instagram डिटेल्स, आजच करा ही सेटिंग !