उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकचा वृद्धाला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरमध्ये हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. भरधाव ट्रकने एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये (accident) वृद्ध व्यक्तीचा जागीत मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाला स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करत ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी उल्हासनगरमध्ये ट्रकच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. लक्ष्मण चिंचोरिया (७१ वर्षे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ मधील गोल मैदान येथील शिवशक्ती मेडिकलसमोर हा अपघात झाला. ट्रकने लक्ष्मण यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, लक्ष्मण चिंचोरिया गोल मैदान येथील शिवशक्ती मेडिकलसमोरून रस्ता ओलांडत असताना ट्रकने त्यांना धडक दिली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. अपघाताची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्ध व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातानंतर उल्हासनगर पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेतले अशून चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ट्रक भगवती ट्रान्सपोर्टचा असल्याची माहिती समोर आली आहे. भगवती ट्रान्सपोर्ट उल्हासनगर शहरभरामध्ये किराणा मालाचा पुरवठा करतो. मोठ्या वाहनांना शहरामध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेश नसतो. असे असताना देखील हे ट्रान्सपोर्टवाले उल्हासनगरमध्ये बेदरकारपणे वाहनं चालवत असल्याचे दिसून येत आहे

हेही वाचा :

Icc T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी पहिली टीम फिक्स

मोठी बातमी! चीनकडून सोनं खरेदीला ब्रेक; सोन्याच्या , दरांवर परिणाम

रेणुका स्वामी मर्डर मिस्ट्रीत नवा ट्वीस्ट; प्रसिद्ध अभिनेत्याला अटक